मुंबई : आयसीसीने जानेवारी २०२१ महिन्यापासुन प्रत्येक महिन्यात चांगली कामगीरी करणाऱ्या क्रिकेटपटुला आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्यातील पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात सलग दुसऱ्या महिन्यात भारतीय खेळाडुंचा समावेश नाहीये.
मे महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटुचा पुरस्कार हा बांग्लादेशचा मुशफिकुर रहीमने पटकावला आहे. मे महिन्यात मुशफिकुर रहीमने श्रीलंकेविरुद्ध एक कसोटी आणि २ एकदिवसीय सामने खेळले होते. एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने १२५ धावांची शतकी खेळी साकारली होती. त्या मालिकेत त्याने एकुण २३७ धावांचा रतिब घातला होता. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याच्या या कामगीरीमुळे त्याला आयसीसीचा मे महिन्याचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटुचा पुरस्कार मिळाला.
1/1 – 100s/50s ⚡
237 ODI runs ????Presenting the ICC Men’s Player of the Month for May 2021 ????#ICCPOTM pic.twitter.com/bOn0aN0S37
— ICC (@ICC) June 14, 2021
तर महिला क्रिकेटपटुमध्ये मे महिन्यातील सर्वेत्कृष्ट क्रिकेटपटुची मानकरी स्कॉटलंडची कॅथरिन ब्राइस ही ठरली आहे. कॅथरीनने मे महिन्यात आयर्लंडविरुद्ध ४ टी-२० सामन्यात ९६धावा केल्या. तर याच मालिकेत तीने ५ गडीही बाद केले होते. याच कामगिरीमुळे तिला हा पुरस्कार मिळाला. यादरम्यान एप्रिल महिन्यापासुन भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसल्याने सलग दुसऱ्या महिन्यात भारतीय खेळाडूंना मानाकंन मिळाले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- गेल्या तीन वर्षांपासून छावणी चालकांवर दुष्काळ; वीस टक्के बिलाची रक्कम अद्याप प्रतीक्षेत
- WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम
- ‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!
- इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा


