Share

बाळासाहेबांची शिवसेना तीच! पण वाजपेयींचा भाजप मोदींनी धंदेवाईक केला- उद्धव ठाकरे

Published On: 

पालघर: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

“बाळासाहेबांची शिवसेना तीच आहे पण वाजपेयींचा भाजप मोदींनी धंदेवाईक करून टाकला आहे” असे म्हणत पालघरच्या प्रचारात तुम्ही अगडबंब फौज, मंत्री, संत्री, वाजंत्री आणलीत तरी विजयाची तुतारी शिवसेनाच फुंकेल असा वज्रनिर्धार उद्धव ठाकरे यांनी केला. ‘शिवरायांचा घोर अवमान करणाऱ्या छिंदमच्या अवलादींनी तुमचं रक्त नासलंय’. अश्या तीव्र शब्दात त्यांनी भाजवर वार केले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

शिवरायांचा घोर अवमान करणाऱया छिंदमच्या अवलादींनी तुमचं रक्त नासलंय. देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून लढणाऱया जवानांच्या माता-भगिनींची विटंबना करणाऱया परिचारकमुळे तुमचं रक्त सडकं झालंय. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उपऱ्यांना घेऊन तुमच्या रक्ताची भेसळ झाली आहे. परंपरेची पार्टी असल्याचा टेंभा कसला मिरवता! आधी छत्रपतींची माफी मागा, मग पालघरमध्ये मतं मागा! तुमच्या रक्तात खऱ्या भाजपची एक जरी पेशी शाबूत असेल तर अस्सल भगवं रक्त असलेल्या शिवसेनेशी होऊन जाऊ दे जंग’ अशी उद्धव ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!