🕒 1 min read
टीम महाराष्ट देशा:राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचा नेतृत्वाचा समाचार घेत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.सध्या फडणवीसांचे सर्वचं अंदाज चुकत आहेत, त्यामुळे त्यांनी चांगला ज्योतिषी शोधावा अशी बोचरी आणि खोचक टीका थोरात यांनी केली आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन राजकीय पक्षांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे आरोप सतत भाजपकडून करण्यात येत आहे.याच मुद्यावरून थोरात यांनी निशाणी साधला आहे.
बाळासाहेब थोरात हे सध्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी युतीच्या 220 जागा येणार, विरोधीपक्ष नेता करता येईल एव्हढ्या जागा सुद्धा विरोधकांना मिळणार नसल्याचा दावा केला होता.तो दावा साफ खोटा ठरला आहे.असेही थोरात पुढे म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
