Share

‘राज्यातील पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन तातडीने लसीकरण करून घ्या’

Published On: 

मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. दरम्यान, फ्रंट लाईन वर्कर्सना असलेला धोका ओळखून प्राधान्याने लसीकरण करण्यात आले आहे.

गेल्या वर्षभरात अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला असून आता राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांनी यापूर्वीच पत्रकारांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांचे देखील लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे अशी मागणी थोरात यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

बाळासाहेब थोरात यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र –

कोरोनाच्या संकटकाळात आपण अत्यंत संयमाने महाराष्ट्राची काळजी घेत आहात. अनेक लोकोपयोगी निर्णय आपण घेतले आहेत. आपल्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या हितासाठी कार्यरत आहे. एक विषय मात्र आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, पत्रकार हे सातत्याने बातमीदारी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही धोका आहे.

या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे असे माझे मत आहे. तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यातील सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. तरी आपण या संदर्भाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!