Share

‘प. बंगाल मध्ये होणाऱ्या हिंसा या राजकीय पक्षाविरोधात नाही, तर हिंदूना संदेश देणाऱ्या घटना’

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : विधानसभा-लोकसभा पोटनिवडणुकांसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशाचं लक्ष्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे.

मात्र आता निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचं दिसून येत आहे. कालपासून सुरु झालेल्या या हिंसाचारामध्ये ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. हा हिंसाचार तृणमूल कॉंग्रेसने घडवून आणली असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे. ‘प. बंगाल मध्ये होणाऱ्या हिंसा या एका राजकीय पक्षा विरोधात नाही…तर हिंदूना एक संदेश देणाऱ्या घटना आहेत. ६५ टक्के विभाजित समाजाला सहजपणे हरवू शकतो.आज प.बंगाल… उद्या हिंदुस्तान ??’ असं नितेश राणे म्हणाले आहेत. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बंगालमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून कार्यकर्त्यांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही, असं म्हणत हिंसेचा निषेध केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!