टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे मंगळवारी संकेत दिले होते . राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले आहेत. भविष्यात आम्ही एक होणार असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं होते.
त्यांच्या याचं वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, ‘पुरोगामी लोकशाही आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे विचार आणि तत्त्व एकच आहेत. आम्ही आघाडी म्हणूनच काम करीत आहोत. दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाचा विषय कोठेही चर्चेत आलेला नाही. त्यामुळे यावर वक्तव्य करणे योग्य नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे. ते संगमनेरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, ‘११९९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर दोन्ही पक्ष आघाडीत काम करीत आहेत. आमचे विचार एकच आहेत. सध्या तरी दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाचा विषय कोठेच आलेला नाही. मात्र, काळाच्या ओघात काय होईल सांगता येत नाही. तरीही त्यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही.’ असे ही थोरात म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एक होणार अशी अफवा पसरली होती. परंतु यातून काहीच तथ्य समोर आले नव्हते. त्यामुळे आता शिंदे यांच्या विधानाने खरच एकत्र येतील की हीसुद्धा अफवाचं ठरेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शरद पवार हे यापूर्वी कॉंग्रेसमध्येचं होते. १९९९ ला त्यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर कॉंग्रेससोबत आघाडी करत केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी ही कॉंग्रेसमध्ये विलीन होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181805148063948800?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181813207201021953?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

