Share

‘खरी मदत खरा फायदा, खऱ्या सरकारची खरी कर्जमाफी’… – बाळासाहेब थोरात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यभरातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक गुड न्यूज दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे.

राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी होणार याकडे राज्यातील शेतकरी डोळे लावून बसले होते. त्या दृष्टीने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. मात्र उद्धव ठाकरे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार असे म्हणाले होते. मग आता दोन लाखापर्यंतच कर्जमाफी का दिली ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारात या घोषणेचा निषेध करुन सभात्याग केला.

यावर आता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आधार देण्याचा शब्द महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पूर्ण करत आहे. दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा आज झाली आहे. शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपून आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत आहोत. ऑनलाइन अर्जाच्या नावाखाली मागील सरकारने शेतकऱ्यांचा जो अपमान केला होता, पती-पत्नीला एकत्रित बोलावून रांगेत उभे करून शेतकऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देण्याचे पाप केले होते, आम्ही मात्र कर्जमाफी हा शेतकऱ्याचा हक्क आहे असे मानतो, त्यामुळे शेतकऱ्याला सन्मानाने कर्जमाफी दिली जाईल. अस थोरात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1208359654004162562?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1208352538098978816?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!