सांगली : माझा महाराष्ट्र खरोखर सोन्यासारखा आहे. तुमचे महाविकास आघाडीचे सरकार दगाफटक्याने सत्तेत आले आहे आणि ते सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राला लुटण्याची एकही संधी सोडत नसल्याची घणाघाती टीका भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवरती केली आहे.
महाराष्ट्रात एकच वाघ होते. ते म्हणजे हिंदुंचे हिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे तुमच्या सारख्या हुजऱ्यांना वाघाच्या शेपटाचीही उपमा देता येणार नाही अशी टीका त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवरती केली आहे. ते आज सांगलीमधील झरे येथे बोलत होते.
मागील दोन वर्षाती कोकणाला वादळाने दोन वेळा फटका दिला. शेतकऱ्यांची पीक दुष्काळात तर कधी ओल्या दुष्काळामुळे माती मोल झाली. स्वप्नील लोणकर सारखा होतकरू मुलगा आत्महत्या करतो. महाराष्ट्रात लालपरीची सेवा देणाऱ्या तब्बल २८ कर्मचाऱ्यांना पगाराअभावी आत्महत्या करावी लागत आहे. तर अनेक बारा बलुतेदारांवर, भटक्यांवर आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या करण्याची वेळे येत असताना तुम्ही फक्त मदतीचे कागदी घोडे नाचवता आहात आणि मुळात खरी मदत कधी पोहचतच नाही असा आरोपही पडळकर यांनी सरकार वरती केला आहे.
सामान्यांच्या निर्णयासाठी तुमच्या तिघाडीत बिघाडी असते. पण बदलीतून मिळणाऱ्या मलीद्यासाठी तुमच्या एक वाच्यता असते. म्हणूनच तुमच्यासाठी रोजच दिवाळी आणि दसरा आहे. जनाब राऊत मेंढ्या ह्या शेतकऱ्यांसाठी जीविकेचे साधन आहे. ते दुधही देते आणि ऊबही देते. हे तुम्हा वसुलीवाल्यांना समजणार नाही असही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है म्हणू नये; गुलाबरावांचा मनसेला टोला
- आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का?; राम कदमांचा सवाल
- ‘महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भाजपचा बुरखाच फाटला’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- तर ५६ शिवसेनेचे आमदार आता भाजपसोबत असते – गुलाबराव पाटील


