टीम महाराष्ट्र देशा : एमआयएमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावं. राज ठाकरे यांच्याबद्दल हिन दर्जाची टीका सहन केली जाणार नाही. अशी टीका झाली तर मनसे दणका दिला जाईल, असा इशारा मनसेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एमआयएमला दिला आहे.
मनसेने आपल्या पहिल्या अधिवेशनातक आपला बदलेला झेंडा आणि हिंदुत्त्वाच्या भूमिकेवर जोरदार चर्चा सुरु आहे. त्यानंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेवर टीका केली. त्यावर नांदगावकर यांनी इम्तियाज जलील यांना इशारा दिला आहे.
बाळा नांदगावकर म्हणाले, “इम्तियाज जलील चूकून लॉटरी लागल्याने खासदार झाले आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं. या महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या नादाला लागायचं नाही हे आत्ताच लक्षात ठेवा. पाहिजे तर आबू आझमींना विचारा. आमच्या अंगावर येऊ नका, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ. तुम्ही प्रयत्न करुन तर पाहा, मग तुम्हाला कळेल. आमच्या नादाला लागायच्या फंदातही पडू नका, नाहीतर खूप महागात पडेल.”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

