Share

बाळासाहेबांच्या अटकेची फाईल माझ्या कार्यकाळात तयारच झाली नव्हती- छगन भुजबळ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनेने भुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांच्या अटकेसाठी केलेला आटापिटा महाराष्ट्र विसरला नाही. असे अनेक वेळा स्पष्ट केले आहे. मात्र एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

बाळासाहेब ठाकरे अटकेच्या आदेशाची फाईल आपल्या कार्यकाळात नव्हे, तर आधीच्या सरकारच्या कार्यकाळात तयार झाल्याचे विधान भुजबळांनी केले आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत उसळेल्या दंगलीच्या तपासासाठी जस्टीस श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाच्या शिफारशीनुसारच आपण कारवाई केल्याचे भुजबळ म्हणाले.

”गृहमंत्री झाल्यानंतर सगळ्या फाईल पुढे गेलेल्या होत्या. मात्र नेमकी बाळासाहेबांच्या अटकेचीच फाईल माझ्यासमोर आली. पोलिसांनी सांगितलं यावर कारवाई करायला पाहिजे. त्यानंतर त्या फाईलवर फक्त सही केली, ती फाईल माझ्या कार्यकाळात तयार झाली नव्हती,”

नेमके काय घडले होते तेव्हा ?

१९९९ मध्ये युतीचं सरकार गेलं आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार आलं. जुलै २००० मध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांनी १९९२-९३ या कालावधीतील ‘सामना’मधील अग्रलेखांमुळे दंगल पेटल्याचा ठपका ठेवत बाळासाहेबांना अटक करण्याचा निर्णय घेतला होता. तीन दिवस मुंबईत तणाव होता. नंतर बाळासाहेब आपणहून न्यायालयात हजर झाले, पण प्रत्यक्षात न्यायाधीशांनी खटलाच फेटाळला व अटकेची वेळच आली नाही.

जुलै १९९९ मध्ये युतीचं सरकार सत्तेवर असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला. नंतर २००७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी दीर्घकालावधीनंतर मतदान केलं

भुजबळ हे राज्याचे गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी त्यांनी जो आटापिटा केला होता. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या अटकेनंतर उसळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेव्हाच्या दिल्लीवाल्यांनी इतर राज्यांची पोलीस कुमक महाराष्ट्रात पाठवली होती.

म्हणजे शिवसेनेच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची ‘गुप्त’ युती ही तेव्हापासून आहे. अर्थात हे अटकमटक प्रकरण सरकारवरच उलटले. अश्या शब्दात सामनातून भुजबळ, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर शाब्दिक वर केले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!