Share

भाजप आमदार आणि ‘मी सावरकर’ यावरून बच्चू कडू आक्रमक, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या सावरकरांचा मुद्दा चांगलाचं चर्चेत आला आहे. यावरून भाजप आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलीचं जुंपली असल्याचं दिसत आहे. भाजप नेते केवळ आपले अपयश झाकून नेण्यासाठी वीर सावरकरांच्या नावाचा वापर करत आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. तर शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्याची टीका भाजपकडून होत आहे. या साऱ्यात राज्यातील महत्वाच्या प्रश्नांना बगल दिली जात असल्याची प्रतिक्रिया प्रहारचे आ. बच्चू कडू यांनी दिली आहे.

सावरकरांच्या मुद्यापेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न हा अतिशय गंभीर आहे. यावर लक्षकेंद्रित केले पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले. तर पक्ष कुठलाही असू द्यात. भावनेचं धर्माचं राजकारण करुन मतं अधिक पेटीत कसे पक्के होतील, हा खेळ सर्वच पक्षांकडून सुरू आहे. हा खेळ थांबला पाहिजे. मुळात जिथं मरण अटळ आहे, ते मुद्दे समोर घेऊन काम करणे गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.सावरकर कुठं आणि हे भाजपाचे आमदार कुठं, मी सावरकर लिहिताना थोडी लाज-लज्जा ठेवायला नको का? असा प्रश्नही बच्चू कडूंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान राज्यात हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सावरकरांच्या मुद्यावरून चांगलाच गाजला. भाजपने राहुल गांधीच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही हल्ला केला. सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली आहे, असा घणाघातही देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर ‘मी सावरकर’ अशा टोप्या घालत विधानभवना बाहेर आंदोलन केले.

अधिवेशनाचा पहिला दिवस संपताचं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ब्रिटीश पार्लमेंटमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचया नावाला बंदी आहे. तशीच बंदी आपल्या विधानसभेतही आहे का ? जर महाराष्ट्राच्या विधानसभेत सावरकरांविषयी बोलायचं नाही तर मग कोठे बोलयचं ? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1206529739940233216?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206528082225459200?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206488020913799169?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!