मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज (१५ नोव्हेंबर) पुण्यात निधन झालं. ज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरु असताना आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी देखील बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
‘बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे आमच्या कुटुंबाची वैयक्तिक हानी झाली. शिवाय आपलं सामाजिक नुकसानही झालंय. असा माणूस हा शतकांमधून एकदाच होतो आणि ती व्यक्ती आपल्यासोबत होती. त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत होते. हे खूप मोठं भाग्य होतं, असं मला नेहमी वाटायचं. माझ्या बालपणापासून, अगदी पहिल्या पावलापासून त्यांचा हात माझ्या डोक्यावर होता. या दु:खात आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत’, असं मृणाल कुलकर्णी म्हणाल्या.
‘बाबासाहेब म्हणजे चालता बोलता इतिहास होते. त्यांच्यावर देवाची कृपादृष्टी होती. असा माणूस पुन्हा होणे नाही. त्यांच्या स्मृती सतत आपल्यासोबत राहतील’, अशा शब्दांत त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंना यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुरंदरे वादग्रस्त पवारांसाठी असतील आमच्यासाठी नाही’, भाजपचा पलटवार
- ‘आम्ही जुळवून घ्यायचं ठरवलंय, तुम्ही दिवस मोजत बसा’
- विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर यशोमती ठाकूर यांचा निषेध
- अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

