मुंबई : अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी व दिग्दर्शिका ताहिरा कश्यप हिला अचानक तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले याच कारण दूधी भोपळा. होय.. दूधी भोपळ्याचा रस ताहिराला इतका बाधला की, तिला थेट आयसीयूमध्ये भरती करावं लागलं. याचा खुलासा खुद्द ताहिरा कश्यपने एक व्हिडीओ शेअर करत केला आहे.
ताहिराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत कडू दूधी भोपळ्याचा रस प्यायल्यानंतरची तिची झालेली अवस्था सांगितली आहे. या व्हिडीओत ती म्हणते, ‘मी स्वतःला फिट ठेवण्यासाठी नेहमी दूधी भोपळा व आवळा व हळदीचा ग्रीन ज्यूस घेत होत. पण त्यादिवशी दूधी भोपळ्याचा रसाची चव काहीशी कडवट होती. तो प्यायला आणि मला उलट्या सुरू झाल्यात. माझा रक्तदाब देखील कमी झाला. मला या कारणामुळे आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. पण आता मी ठीक आहे.’ डॉक्टरांच्या आग्रहास्तव लोकांना जागृत करण्यासाठी मी हा व्हिडीओ शेअर करत असल्याचेही तिने यावेळी सांगितले.
https://www.instagram.com/reel/CUyv0znI2RE/?utm_source=ig_web_copy_link
ताहिरा कश्यप एक प्रोफेसर आहे. तसेच तिने नामक शॉर्ट फिल्म देखील दिग्दर्शित केली आहेत. आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. लग्नाच्या आधी दोघांनी 11 वर्ष एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा 16 वर्षांची असताना आयुष्मान आणि ताहिराची भेट झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘प्रियंका गांधींच्या रुपाने इंदिराजींचे अस्तित्त्व पुन्हा दिसले!’ संजय राऊतांकडून ‘रोखठोक’ कौतूक
- ‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
- मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्री पूत्र आशिष मिश्राला बेड्या


