कल्याण : ‘डोंबिवलीतील प्रदूषण दूर करण्यासाठी सुरक्षा उपकरणे लावा. कारखान्यांना सुधारण्याची संधी द्या. त्यानंतरही प्रदूषण कमी न झाल्यास कारखान्यांना कुलूप लावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. गुरूवारी प्रदूषणामुळे गुलाबी झालेल्या डोंबिवलीतील गुलाबी रस्त्याची पाहणी केल्यावर ते बोलत होते.
डोंबिवलीमध्ये रासायनिक प्रदूषणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याची पाहणी करून झाल्यावर केडीएमसीमध्ये सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दम भरला.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोबिंवलीतील रासायनिक प्रदूषणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याची पाहणी केली. यावेळी केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले असून या कंपन्यांनी एकतर सुरक्षा उपकरणे लावा, नाहीतर मग टाळे ठोका असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केमिकल कंपन्यांना दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोबिंवलीतील प्रदूषणाची पाहणी केलीच. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.

