Share

पाकिस्तानी साखरेची गोदामं पेटवून टाकणार,जितेंद्र आव्हाडांचा सरकारला इशारा

Published On: 

मुंबई : साखरेचे दर कोसळत असतांना मुंबईच्या वेशीवर हजारो क्विंटल पाकिस्तानी साखरेच्या गोण्या दाखल झाल्याचं समोर येत आहे. ज्या गोदामात ही साखर ठेवली जाईल ती गोदामं पेटवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

राज्यात साखरेचं विक्रमी उत्पादन झालेलं असताना पाकिस्तानी साखर आयात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील हवालदिल झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ नव्हे, तर साखर चोळण्याचं काम मोदी सरकारने केल्याची टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

दरम्यान,एका बाजूला राज्य तसेच देशात अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. पाकिस्तानी साखर मुंबईच्या बाजारात आल्याने साखरेचे दर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे सीमेवर सैनिकांचे बलिदान जात असताना देशात मात्र सैनिकांसह शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल जात आहे.

यंदाच्या हंगामात देशभरात विक्रमी साखरेच उत्पादन झाल आहे. त्यातच मागील हंगामातील अतिरिक्त साखर अद्याप शिल्लक आहे. हे चित्र समोर असताना देखील पाकिस्तानची साखर का आयात करण्यात आली, असा प्रश्न निर्माण होत आहे. मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर दाखल झाली असून बाजारभावापेक्षा ती १ रुपयांनी कमी किमतीची आहे.

नजीकच्या काळामध्ये राज्य तसेच देशभरात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे, त्यातच सरकारी धोरणामुळे शेकडो साखर कारखाने संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानमधून साखर आयातकरून सरकार नेमक काय करू इच्छिते हे कळत नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!