Share

शहरात कोरोनाचे १७ रुग्ण झाल्या नंतर औरंगाबाद्करांचे डोळे अखेर उघडले

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरात कोरोनाचे १७ रुग्ण झाल्या नंतर अखेर नागरिकांचे डोळे उघडले आहे. लोकडाऊनच्या सुरुवातीच्या २ आठवड्यात औरंगाबादकर नियम पाळायला तयार नव्हते अनेक लोक रस्त्यावर विनाकारण फिरतांना दिसत होते, मात्र गेल्या चार दिवसात जिल्ह्यात कोव्हीड-१९ संसर्ग बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली असल्याने अखेर शहरवासी सुधारले व विनाकारण किंवा शुक्कल कारणावरून घराबाहेर पडणे कमी केल्याचे दिसते आहे. तसेच अनेक नागरिकांनी एकमत करून शहरातील बरेच भाग स्वतःच बंद केले आहे.

दरम्यान, शहरात बुधवारी (८ एप्रिल) आणखी ३ नवे रुग्ण सापडल्याने शहरातील एकूण रुग्णाची संख्या १७ झाली असून यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर एक रुग्ण कोरोनाच्या संकटातून सावरून रिकव्हर झाली आहे व उर्वरित १५ रुग्नांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता सुरक्षा यंत्रणा देखील सरसावली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असून विनाकारण कोणी फिरतांना आढळ्यास त्यांना थेट जेल होणार असल्याचे पोलिसांद्वारे सांगितले जात आहे.

नागरिकांनी छोटे मोठे रस्ते बंद केल्याने मोकाट फिरणाऱ्यांच्या पळवाटा बंद झाल्याने ते मोठ्या रस्त्यांवर पोलिसांच्या तावडीत सापडतील या भीतीने का होईना घरात बसले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!