🕒 1 min read
औरंगाबाद : महानगरपालिका हद्दीतील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली बाबत प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी स्पेशल मालमत्ताकर वसुली टास्क फोर्सची स्थापना केली आहे. आज(दि.२) स्पेशल मालमत्ता कर वसुली टास्क फोर्स प्रमुख अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी टास्क फोर्सच्या वतीने कारवाई करण्यात आली.
यात झोन ३ येथील शहनावाज खान यांनी त्यांच्या कडील थकीत रक्कम 30 हजार मालमत्ता कर धनादेशद्वारे पथकाकडे भरणा केला. तसेच झोन ३ गल्ली न १८, इंदिरा नगर येथील नासिर खान जुंमा खान यांचे कडून थकीत ७० हजार रोख स्वरूपात वार्ड कार्यालयात भरणा करण्यात आला. झोन ८ विटखेडा येथील साईनाथ सोसायटी यांनी ४४९०४धनादेशद्वारे पथकाकडे भरणा केला. झोन ८ कासलीवाल रेसिडनसी, प्रताप नगर येथील ईश्वरलाल गोविंदराव गुणवानी यांनी त्यांच्या कडील थकीत मालमत्ताकर रु ३४५०० रु रोख स्वरूपात व रु २३४७७ रु धनादेश स्वरूपात पथकाकडे भरणा केला.
झोन ८ विटखेडा शंकर नगर येथील चंद्रभान पाटील यांनी ४०५० रु धनादेश द्वारे पथकाकडे भरणा केला. झोन ६ येथील ज्ञानप्रकाश विद्यामंदिर, विश्रांती नगर यांनी ८५,००० रु डीडी द्वारे पथकाकडे भरणा केला. झोन 6 अंतर्गत नारोळे यांनी २७,००० रु रोख व ५०,००० रु धनादेश द्वारे पथकाकडे भरणा केला. झोन 2 अंतर्गत शारदा श्रम कॉलनी येथील चारुदत्ता सोनवणे यांनी ७७२९१रु ऑनलाईन भरणा केला. झोन 2 अंतर्गत अंगुरी बाग येथील नगीन चंदनमल जैन यांनी 60,000,रु धनादेश द्वारे पथकाकडे भरणा केला.
झोन 5 अंतर्गत सरदार मोहम्मद जावेद खान यांनी 30000 रु रोख स्वरूपात पथकाकडे भरणा केला. झोन 9 अंतर्गत हॉटेल इरा यांनी 75000 रु रोख स्वरूपात भरणा केला. झोन 3 अंतर्गत यामाजी विठोबा यांनी 1,01,390 रु थकीत मालमत्ताकर व पाणीपट्टी भरणा केला. झोन 2 अंतर्गत जय हिंद कॉलनी येथील सखाराम स्वामी यांनी 160509 रु धनादेश द्वारे पथकाकडे भरणा केला. असे एकूण मिळून 5,35,231 रु धनादेश द्वारे व 3 ,37,890 रु रोख स्वरूपात वसूल करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सुधीर मुनगंटीवार यांच्यात बंद दाराआड चर्चा
- महावितरणमधील कर्मचारी कपातीच्या विरोधात मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची निदर्शने
- राष्ट्रवादी व भाजप आमने सामने येणार की समजोता एक्सप्रेस धावणार ?
- बोगस जन्मतारखेद्वारे मिलिट्रीत भरती होण्याचा प्रयत्न, ६ युवकांवर गुन्हा
- ‘मराठवाड्यात पाणी कमी, पण येथील लोकांच्या हृदयात पाण्याची कमी नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
