औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यामध्ये निधी अभावी मोठ्या प्रमाणात विकासकामे थांबली होती. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून नियोजित सर्व १०० टक्के निधी मिळाला आहे. २५ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
आरोग्य विभागासह सर्व विभागांमध्ये कोणकोणते कामे करणे गरजेची असतील त्यावर चर्चा होणार आहे. तसेच कोरोनामध्ये निधी अभावी आमदार निधी, खासदार निधी देखील मिळू शकला नव्हता. त्यामुळे आता अंदाजे २५० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यात खर्च करण्यास मिळणार आहे.
औरंगाबादकरांना आता निधी अभावी विकास कामांना मुकावे लागणार नाही. आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपणार आहे. मार्च मध्ये नवीन अर्थसंकल्प मांडण्यात येतो. त्यामुळे आता खूप मोठा निधी प्रशासनाकडे जमा झाला आहे. आता प्रशासन कशाप्रकारे या निधीचे नियोजन आणि वितरण करते याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय
- ममतादीदींच्या अडचणी वाढल्या,जेष्ठ मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा
- शेतकरी आंदोलन : शेतकरी आणि सरकारमध्ये आज अकराव्यांदा होणार चर्चा !
- टीम इंडियानं सर्वांना ‘आत्मनिर्भर’तेचा धडा शिकवला : मोदी
- मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

