Share

औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू, आजपासून हैदराबादलाही होणार उड्डाण

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संकटामुळे बंद असलेली असलेली इंडिगो सेवा पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिगोकडून दिल्ली साठी विमान सुरू झाली आहे. दिल्ली-औरंगाबाद -दिल्ली हे विमान सोमवारी (दि.५) सुरू करण्यात आले. या विमानाने दिल्लीहून शंभराच्यावर प्रवासी उतरले. औरंगाबाद विमानतळावर पुन्हा एकदा विमानांची लगबग सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. आजपासून हैदराबादसाठीही विमानसेवा सुरू होत आहे.

इंडिगो विमान कंपनीने दिल्ली-औरंगाबाद -दिल्ली हे विमान सुरू करण्याची घोषणा केली होती. औरंगाबाद विमानतळावर दिल्लीहून साधारणतः दुपारी एक वाजेच्या दरम्यान विमान पोहोचले. या विमानातून औरंगाबादला ११२ विमान प्रवासी उतरले. तर दिल्लीकडे जाणाऱ्या या पहिल्या विमानाने औरंगाबादहुन २१ प्रवासी निघाले. औरंगाबाद दिल्ली ही विमानसेवा सुरू झाल्याने औरंगाबादच्या प्रवाशांचा चांगलाच दिलासा मिळाला आहे. यापूर्वी औरंगाबाद विमानतळावरून मुंबई औरंगाबाद दिल्ली असे एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्त प्रवास भाडे द्यावे लागत होते.

तर इंडिगो विमान दिल्लीसाठी सुरू करण्यात आले होते. त्यामुळे सध्या साडेचार ते पाच हजार रुपयांमध्ये औरंगाबाद ते दिल्ली असा प्रवास होणार आहे.दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली हे विमान आठवड्यातील तीन दिवस चालवण्यात येणार आहे. सोमवार बुधवार आणि शुक्रवार हे विमान दिल्लीकडे उड्डाण करणार असल्याची माहिती औरंगाबाद विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली. इंडिगो एअरलाइन्स कंपनीने दिल्ली औरंगाबाद दिल्ली पाठोपाठ हैदराबाद- औरंगाबाद -हैदराबाद हे विमान हे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ जुलैला आजपासून हे विमान सुरू करण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!