मुंबई : सद्या शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना मुंबईमध्ये चांगलाच पेटलेला दिसत आहे. यातच कांदिवली पूर्वचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आणखी एका मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यामुळे कंगना रनौत प्रकरणी मराठी अस्मितेचा बुरखा मिरवणाऱ्या शिवसेनेचा प्रताप समोर आला आहे.
दोन ज्येष्ठ मराठी अधिकाऱ्यांना डावलून युवासेना अध्यक्ष व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हट्टापायी संगीता शर्मा या हिंदी भाषिक अधिकाऱ्यांच्या गळ्यात टाकण्यात आल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे. ” युवराजाच्या हट्टापायी महापालिकेत ‘मराठी’चा गेम…शुभांगी सावंत यांच्यासह दोन सीनियर मराठी अधिकाऱ्यांचा ज्येष्ठता क्रम डावलून संगीता शर्मा यांच्या गळ्यात महापालिका चिटणीसपदाची माळ. मराठी माणसाचा बेगडी आणि सोयीस्कर पुळका दाखवणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा चेहरा उघड…”असे ट्विट करत त्यांनी शिवसेनेवर आरोप केला आहे.
युवराजाच्या हट्टा लपायी महापालिकेत 'मराठी'चा गेम…
शुभांगी सावंत यांच्यासह दोन सीनियर मराठी अधिकाऱ्यांचा ज्येष्ठता क्रम डावलून संगीता शर्मा यांच्या गळ्यात महापालिका चिटणीसपदाची माळ. मराठी माणसाचा बेगडी आणि सोयीस्कर पुळका दाखवणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा चेहरा उघड… pic.twitter.com/pM8XipVYf1— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 16, 2020
काय आहे हे प्रकरण?
मुंबई महापालिकेच्या चिटणीसपदी संगीत शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमध्ये पद ज्येष्ठतेतील दोन अधिकाऱ्यांना डावलण्यात आले आहे. गेले महिनाभर या पदावरून घोळ सुरु होता. आता, या नियुक्तीवरून भाजपने सडकून टीका केली असून पदज्येष्ठता डावलून मराठी महिला अधिकाऱ्याला उच्च पदापासून दूर ठेवणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचा निषेध देखील केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- केंद्रात आरएसएस, बीजेपीचे सरकार आल्यानंतर त्यांनी ‘एल्गार परिषदेला’ बदनाम केले : ऍड. प्रकाश आंबेडकर
- सिनेसृष्टी ‘गटार’ नाही, सामनाने केले जया बच्चन यांच्या भूमिकेचे समर्थन तर कंगनाला काढला चिमटा
- शरद पवारांकडे जर एल्गार परिषदेबाबत काही दस्ताऐवज असतील तर ते खोटे आहेत
- के.के.रेंज संदर्भात शरद पवार व राजनाथ सिंह यांची गुरुवारी दिल्लीमध्ये बैठक!
- नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक; मराठा क्रांती मोर्चा तर्फे बुधवारी नवी मुंबईत आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

