Share

‘ज्यांना जागांची पन्नाशी गाठण्यासाठी पावसात भिजावं लागतं त्यांनी १०५ जागा जिंकलेल्या भाजपाबद्दल न बोललेले बरं’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २५ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीविरोधात भाजप मोर्चा काढणार आहे. मात्र मोर्च्याआधी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. मंत्री नवाब मलिक आणि आमदार अतुल भातखळकर या दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.

कमलाबाईला शिवसेनेने सोडचिठ्ठी दिली असून, आता त्यांच्या सोबत जायला ते तयार नाहीत. भविष्यात भाजपचे 15-20 आमदार सुद्धा निवडणून येणार नसल्याचे सुद्धा मलिक म्हणाले.याला जोरदार प्रत्युत्तर भातखळकर यांनी दिले आहे. ‘ज्या पक्षाच्या नेत्याला जागांची पन्नाशी गाठण्यासाठी पावसात भिजाव लागते त्यांनी १०५ जागा जिंकलेल्या भाजपाबद्दल न बोललेले बरे’असा टोला आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना लगावला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पुन्हा निवडणूका झाल्यास जनता महाविकास आघाडीला उत्तर देईल, अशी टीका पत्रकार परिषदेदरम्यान केली होती. २५ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीविरोधात मोर्चा काढणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली होती. यावरून नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात 25 फेबुवारीला राज्यातील सर्वच तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या अधिवेशनात घेण्यात आला आहे. तर भाजपकडून काढण्यात येणाऱ्या या मोर्च्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

मलिक म्हणाले की, भाजपकडून 400 ठिकाणी करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी भाजपकडे तेवढी लोकं आहे का ? भाजपचा फुगा आता फुटलेला असून, आमची सत्तास्थापन होऊन दोन महिने झाली नाही आणि हे म्हणतात आंदोलन करू. भाजपने सत्तेत असताना जे काही केलं त्यामुळे महराष्ट्रात आज हे सर्व घडत आहे. त्यामुळे सुधारणा करण्यासाठी थोडा वेळ लागेल.भाजपच्या आंदोलनासाठी माणसे पैसे देऊन, रोजंदारीवर येणार आहे का ? भाजपकडे आता लोकं राहिली नाहीत त्यामुळे, रोजंदारीवर ते लोकं आणू शकतात. कमलाबाईला शिवसेनेने सोडचिठ्ठी दिली असून, आता त्यांच्या सोबत जायला ते तयार नाहीत. भविष्यात भाजपचे 15-20 आमदार सुद्धा निवडणून येणार नसल्याचे सुद्धा मलिक म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!