औरंंगाबाद : औरंगपु-यातील आरती बुक सेंटर समोर लावण्यात आलेली दुचाकी चोरट्यांनी मंगळवारी रात्री लंपास केली. दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार घेण्यासाठी क्रांतीचौक पोलिसांनी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली होती. याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार केल्यावर क्रांतीचौक पोलिसांनी दुचाकी चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करून घेतला.
अनील सुधाकर ठोकळ (रा. लासुरगाव) यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीए-९४१०) औरंगपु-यातील आरती बुक सेंटर समोर मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उभी केली होती. चोरट्याने ठोकळ यांची दुचाकी लंपास केल्याचा प्रकार रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास समोर आला. अनिल ठोकळ हे क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, क्रांतीचौक पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत बुधवारी सकाळी ११ वाजता येण्याचा सल्ला दिला होता.
बुधवारी सकाळी अनिल ठोकळ हे क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्यांच्यावरच प्रश्नाचा भडीमार करून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून त्यांना ठाण्यातून हुसकावून लावले होते. अनिल ठोकळ यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्यावर बुधवारी दुपारी त्यांच्या दुचाकी चोरीची तक्रार नोंद करून चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
- बॉलीवूडमध्ये टिकणे झाले अवघड, कंगनाच्या हातातून निसटले अनेक ‘एंडोर्समेंट’
- महागाईचा निषेध करत पुण्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसने घातले गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध
- जालन्यातील तरुणीचा लग्नाच्या नावाखाली मालेगावच्या तरुणाला पाच लाखांचा गंडा
- UPSC ची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर; आयोगाने नवी तारीखही केली जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

