औरंगाबाद : एटीएम मशीनमध्ये तांत्रीक अडचण निर्माण करुन मशीनची शटर असेम्बली उचकटून पैसे काढण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघा आरोपींच्या पोलीस कोठडीत शनिवारपर्यंत दि.१४ वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी गुरुवारी दिले.
मोहम्मद याहया खुर्शीद (२१) आणि जाकीर खुर्शीद (२३, रा. दोघे रा. भुडबास मुल्थन, मेवात ता. नगीना हरियाणा) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या पोलीस कोठडी दरम्यान करण्यात आलेल्या तपासात आरोपींनी एटीएम मशीनमधुन ५० हजार रुपये काढल्याचे समोर आले आहे. अभिजीत सतीश निकुंभ (३०, रा. काबरा नगर, सुतगिरणी) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांना मुंबईच्या कार्यालयातून फोन करुन बीड बायापास येथील तापडीया प्राईड येथील एटीएमचे असेम्बली शटर तोडून कोणीतरी पैसे काढत असल्याची माहिती दिली. त्यानंतर निकुंभ हे तापडीया प्राईट येथील एटीएमवर गेले असता तेथे दोन जण एटीएम तोडण्याचा प्रयत्न करतांना दिसले. त्यांनी महानुभव चौकीतील पोलीसांच्या मतदीने वरील दोघा आरोपींना पकडले. तोपर्यंत आरोपींनी एटीएमचे असेम्बली शटर उचकटून त्यातील ३९ हजार रुपये काढले होते. प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील जरीना दुर्राणी यांनी आरोपी मोहम्मद याहया याच्या अॅक्सीस बँकेच्या खात्यातून ८ लाख १ हजार ७२३ आणि आयडीबीआय बँकेतील खात्यातून २५ लख ६२ हजार १२२ रुपयांचा व्यवहार झाला आहे, तर जाकीर खुर्शीद याच्या अॅक्सीस बँकेतून१७ लाख ४७ हजार ५९८ रुपयांचा व्यवहार झाला आहे, त्याबाबत तपास करणे आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी कोणत्या जिल्ह्यात गुन्हे केले आहेत, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास करणे असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या नावाने चाकणमध्ये पैशांची मागणी; मंत्रालयानंतर आणखी एक प्रकरण आले समोर
- ‘मेळघाटातील ४९ नवजात शिशुंच्या मृत्युला यशोमती ठाकूर जबाबदार’, खा.नवनीत राणा स्मृती इराणींच्या भेटीला
- बाप्पा कोरोना घालव रे…! पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला महत्वाचा निर्णय
- ‘हॅलो, मी शरद पवार बोलतोय!’; बदलीसाठी थेट मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ फोनमुळे खळबळ
- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाबाबत खा. प्रीतम मुंडेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

