Share

मनसे व काँग्रेसमार्गे राष्ट्रवादीत घरवापसी करणारे पवार आहेत तरी कोण ?

Published On: 

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधान सभेची निवडणुक लढवून चर्चेचे धनी ठरलेल्या एका राजकीय नेतृत्वाने नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल व विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. तर ही केवळ घरवापसी असल्याचे मत या नेतृत्वाने व्यक्त केले. पण योगायोग का होईना मात्र राजकीय नेतृत्वाचे आडनाव ‘पवार’ असे आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यामातून नागपूर शहरास भाजपाचा गड म्हणून ओळख लाभली. तरीही येथील काही नेते कधी कोणत्या पक्षाचे काम करतील याचा नेम नसतो. याचाच प्रत्यय आला आहे. कधीकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाची धुरा सांभळणारे प्रशांत पवार यांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन वेगळीच कमाल केली आहे.

कारण लोक ज्यावेळी त्यांना मनसेचे नेते म्हणून ओळखू लागले होते त्याचवेळी त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याशी मैत्री वाढवली होती. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत गडकरींना टक्कर देण्यासाठी नाना पटोले यांनी प्रशांत पवार यांच्याच कार्यालयास काँग्रेसचे मुख्यालय बनविले होते. त्यानंतर प्रशांत पवार काँग्रेसमध्ये जाणार अशीही चर्चा होती. मात्र राजकारणात मित्रत्वाचे नाते कोणते वळण येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कधीकाळी मनसेचा झेंडा व नंतर काँग्रेसचा झेंडा फडकविलेल्या प्रशांत पवार यांनी राष्ट्रवादीत जाण्याचे निश्चित केले.

पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात प्रशांत पवार यांनी घरवापसी करीत असल्याचे सांगितले कारण त्यांनी १९९९ साली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल पटेल व विद्यमान गृहमंत्री अनिल देखमुख यांच्या सोबत काम केले आहे. मात्र तत्कालीन स्थानिक नेत्यांच्या वैचारिक मतभेदामुळे पक्ष सोडावा लागल्याचे पवार म्हणाले. पुढे मनसेत प्रवेश घेतला पण स्थानिक नेत्यांना कामांचा झपाटा सहन झाला नाही. शेवटी पाच वर्षे पक्षसाठी झटलो मात्र तत्वांशी तडजोड न जमल्यामुळे मनसेलाही राम राम ठोकला असल्याचे प्रशांत पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

राजेश टोपेंची शरद पवारांना सध्या राज्यात न फिरण्याची विनंती

लवकर बरे व्हा, रोहित पवारांच्या निलेश राणेंना सदिच्छा

फालतू आणि भामट्या लोकांना आम्ही सोबत घेत नाही – राजू शेट्टी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!