मुंबई : मालाडमधील पुष्पा पार्क परिसरात चुलत भावाने बहिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घडना घडली. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी चेतन चव्हाण याला अटक केली. पोलिसांनी चेतनवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ४ वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या आई – वडिलांचा अपघातात मृत्यू झाला होता. आई वडिलांच्या मृत्यूनंतर पीडित मुलगी मालाडमध्ये आपल्या मामा – मामीकडे वास्तव्यास होती. चेतनने अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला असता मुलीने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. यानंतर मुलीने दिंडोशी पोलीस ठाण्यात चेतन विरोधात तक्रार दाखल केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
