टीम महाराष्ट्र देशा – ‘गावा-गावातली बोलत आहे पारु माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु’ अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरे सरकारकडे वाईन शॉप्स सुरु करु नका, अशी मागणी केली आहे.
माझं राज्य सरकारला निवेदन आहे, की लॉकडाउनच्या कालखंडात अनेक लोक जे दारु पित होते, नशा करणारे होते. दारुची दुकानं बंद असल्याने त्यांची दारु बंद झाली आहे. त्यामुळे दारुची दुकानं सुरु करणं योग्य राहणार नाही, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
अनेक लोकांचे उद्ध्वस्त होणारे संसार सावरले जात आहेत. अनेक घरांमधल्या महिला खुश आहेत. गावा-गावतली म्हणू लागली आहे पारु आता माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु. अशा पद्धतीचं आनंदाचं वातावरण महिलांमध्ये आहे. छोट्याश्या महसुलासाठी दारुची दुकानं सुरु केली तर मद्यपान करणाऱ्या लोकांना वाव मिळेल, असं आठवले म्हणाले आहेत.
राज ठाकरे यांनी पत्र पाठवून राज्य सरकारने महसुलासाठी वाईन शॉप सुरु करण्याचा विचार करावा अशी सूचना केली होती. त्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीकाही करण्यात आली.
लॉकडाऊनच्या मद्यविक्री ची दारूची दुकाने सुरू करू नका. थोड्या महसुलासाठी दारू ची दुकाने सुरु करू नका. गावागावातील बोलत आहे पारू माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारू। त्यामुळे दारूदुकाने लॉकडाऊन मध्ये बंदच असावीत. pic.twitter.com/h8O4yvcSgu
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 25, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

