🕒 1 min read
अहमदनगर : जिल्ह्यातील पारनेर (Parner) येथील टाकळी ढोकेश्वर (Takli Dhokeshwar) येथील नवोदय विद्यालयात ८२ विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. सर्व कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh lanke) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. काळजी नसावी, मी सोबत आहे. असे आ. लंके म्हणाले आहेत.
याबाबत आमदार निलेश लंके ट्विट करत म्हणाले, ‘काळजी नसावी, मी सोबत आहे! माझ्या मतदारसंघातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालय येथे राज्यातील अनेक भागांतील मुलं शिकण्यासाठी आली आहेत. त्याठिकाणी आतापर्यंत एकूण ८२ विद्यार्थी कोरोना बाधित झाले आहेत. मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने व माझे कर्तव्य समजून त्या सर्व मुलांचं कोरोनातून बरे होईपर्यंत पालकत्त्व स्वीकारत असून त्यांची सर्व जबाबदारी मी घेतो, तेव्हा त्या मुलांच्या पालकांनी काळजी करू नये.’ असे आ. लंके म्हणाले.
काळजी नसावी,मी सोबत आहे!
माझ्या मतदारसंघातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालय येथे राज्यातील अनेक भागांतील मुलं शिकण्यासाठी आली आहेत. त्याठिकाणी आतापर्यंत एकूण ८२ विद्यार्थी कोरोना बाधित झाले आहेत…#COVID pic.twitter.com/rgCAvvWDEx— Nilesh Lanke – निलेश लंके (@INilesh_Lanke) December 28, 2021
पुढे निलेश लंके म्हणाले, ‘मी सोबत आहे, तसेच त्या मुलांना लागणारी सर्व सुख-सुविधा या बाबत आम्ही काळजी घेत असून, त्या ग्रामीण रुग्णालयात असणारा स्टाफ, डॉक्टर व आरोग्य विभाग यांना सतर्क राहण्याची सूचना केल्या आहेत.’ अशी माहिती निलेश लंके यांनी दिली.
महाराष्ट्रात ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढली आहे. अशातच नवोदय विद्यालयात ८२ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या नवोदय विद्यालयात चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या विद्यार्थ्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’
- ज्या पक्षाने देशात लोकशाही प्रस्थापित केली त्याचे आम्ही वारस आहोत- राहुल गांधी
- “‘ही’ परिस्थिती सरकारच्या नाकर्तेपणाची व महाराष्ट्राच्या दुर्देवाची साक्ष देते”
- देशाचा स्वातंत्र्यलढा, लोकशाहीची स्थापना व राष्ट्र उभारणीत काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान-अशोक चव्हाण
- आयपीएलच्या पुढील हंगामात ‘हे’ खेळाडू असणार 10 संघांचे कर्णधार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

