Share

रात्री आठ वाजेच्या ठोक्याला शहर झाले सामसूम, आज जिल्ह्यातील सर्व बँका बंद

Published On: 

औरंंगाबाद : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण व पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या आदेशाने शुक्रवारी (दि.१९) रात्री आठ वाजेपासून शहरात संचारबंदीला सुरूवात झाली. कोरोना संसर्गाची धास्ती घेतलेल्या व्यापा-यांनी शुक्रवारी रात्री आठच्या ठोक्याला आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद केल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेत सामसूम असल्याचे दिसून आले. दरम्यान, शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जिल्ह्यात संपूर्णपणे लॉकडाऊन राहणार असल्याने शनिवारी जिल्ह्यातील सर्व बँका बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काढले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्हा प्रशासन, मनपा व आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. घाटी रुग्णालयासह, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी रुग्णसंख्या वाढत आहे. बेडची कमतरता भासत असल्याने कोरोनाची लक्षणे असणा-या रूग्णांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. असे असतांना देखील शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने १९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान रात्री आठ वाजेपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण व पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी घेतला आहे.

दरम्यान, शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शहरातील सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद झाल्याने समर्थनगर, निरालाबाजार, औरंगपुरा, शहराची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, सिटीचौक, शहागंज या भागात सामसूम झाली असल्याचे दिसून आले. तर हॉटेल-रेस्टारंटमधुन रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल सेवा देण्यात येत होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!