टीम महाराष्ट्र देशा : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये असा उपरोधिक सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला होता. यावर अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी विनोद तावडेंचा नियतीने ‘विनोद’ केला आहे. तावडे तुम्ही कॉंग्रेसमध्ये या मी तिकीट देतो असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे.
या निवडणुकीत भाजपने अनेक जेष्ठ नेत्यांची उमेदवारी कापली आहे. त्यात विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रकाश मेहता यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी विनोद तावडे हे नांदेडमध्ये आले असता त्यांनी अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवू नये असं म्हटले होते. परंतु त्यानंतर तावडेंनाचं भाजपने उमेदवारी नाकारली आहे.
त्यानंतर टीका करण्याची आयती संधी मिळाल्यावर चव्हाण यांनी विनोद तावडेंसोबत नियतीनेच विनोद केला. आता त्यांनी लवकर काँग्रेसमध्ये यावं, मी तिकीट देतो अशा शब्दात विनोद तावडेंची खिल्ली उडवली आहे. ते नांदेड उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहन हंबर्डे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.
दरम्यान, तिकीट कापल्यानंतर विनोद तावडेंनी पत्रकार परिषदेत तिकीट का नाकारले याविषयी निवडणूक झाल्यानंतर मी अमित शाह, संघटक मंत्र्यांशी चर्चा करेन असं विधान केले होते. भाजपने विनोद तावडे यांच्या ऐवजी बोरिवलीतून सुनील राणे यांना तिकीट दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181443943717720065?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181443530561994753?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181430112878780416?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

