Share

अशोक चव्हाण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Published On: 

नांदेड- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. चव्हाण यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार,सध्या संपूर्ण जगावर असलेले कोरोना विषाणूचे संकट तसेच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मी यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

चव्हाण म्हणाले, यंदाच्या वाढदिवशी २८ ऑक्टोबरला मी मुंबई, नांदेड किंवा इतरत्र कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसून, शुभेच्छांसाठी येणारे हार-तुरे देखील स्वीकारणार नाही. सर्वांच्या सदिच्छा व सहकार्य नेहमीच माझ्या पाठीशी राहिले आहे आणि यापुढेही ते कायम असेल. ते व्यक्त करण्यासाठी वाढदिवसाचे औचित्य अनिवार्य नाही.

चव्हाण म्हणाले, यंदाची अपवादात्मक परिस्थिती पाहता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणीही प्रत्यक्ष भेटीची तसदी घेऊ नये, ही आग्रहाची विनंती. सर्व शुभचिंतक व चाहते माझी भावना समजून घेतील, याचा मला विश्वास आहे. चव्हाण यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!