Share

‘महिलेवर मागून हल्ला करून शिवसेनेनं आपली औरंगजेबी वृत्ती दाखवलीये’; शेलारांच शिवसेनेला खुलं आव्हान

Published On: 

मुंबई : आम आदमीच्या नेत्याने अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंड खरेदी प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यानंतर काँग्रेससह शिवसेनेनं या प्रकरणी टीकास्त्र सोडलं होतं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून देखील टीका करण्यात आल्यांनतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या टीकेनंतर भाजप युवा मोर्चाने थेट शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला.

भाजप युवा मोर्चाने सेना भवनावर कूच करताच, शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. एकमेकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप भाजपने केला असून आमदार आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी माहीम पोलीस स्टेशनमध्ये जाऊन योग्य कारवाईची मागणी केली आहे. यानंतर आशिष शेलार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे आंदोलन पोलिसांना सूचना देऊन करत होते. या आंदोलनानंतर आंदोलक अटक होऊन गेल्यानंतर लपून छपून पोलिसांच्या आडून एका महिलेवर हल्ला करून शिवसेनेनं औरंगजेबी वृत्ती दाखवलीये,’ असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला.

पुढे, ‘ज्यावेळी सोनिया-वाड्रा देव बनतात तेव्हा तेंडुलकर, साठे आणि आंबेडकर हे शिवसेनेचे दुष्मन होतात. त्यामुळे या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो.’ असं म्हणतानाच लपून छपून भ्याड हल्ले कसले करता ? रणांगणात समोरा-समोर या भाजप तुम्हाला चारीमुंड्या चीत करेल.’ असं शेलार म्हणाले. तसंच, ‘लातो के भूत बातोसे नहीं मानते, त्यामुळे भाजपा आता त्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर देऊ,’ असा इशारा देखील आशिष शेलार यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!