Share

‘शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे’; शेलारांचा राज ठाकरेंवर निशाणा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे #ChokidarकेSideEffects असा हॅशटॅग देऊन राजकीय नेत्यांवर ट्विटरास्त्र सोडत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी याच हॅशटॅगसह पवार कुटुंबावर निशाणा साधला होता. तर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर नाव न घेता त्यांनी टीका केली आहे.

“शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे” असा शब्दात शेलार यांनी ट्विटरवरुन राज ठाकरेंवर शरसंधान साधलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर ‘बारामतीचा पोपट’ म्हणून टीका केली होती. त्यानंतर हे ‘बारामतीचं पोपट पुराण’ सोशल मीडियावर सुरु झालं आहे.

तसेच मनसेला रामराम ठोकलेल्या नगरसेवक आणि आमदारांवरूनही शेलारांनी टोला हाणला आहे. ‘सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही..जाणत्‍या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन.. बारामतीच्‍या काकांनी “फक्त लढ” असे म्‍हटले.!! “शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे” असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!