Share

एका ‘बबड्याच्या’ हट्टापायी राज्यातील विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला; शेलरांचा आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

Published On: 

मुंबई : विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. यामुळे आधीच भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असतानाच विद्यार्थ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचे तसेच गेले अनेक महिने संभ्रमामुळ ज्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले त्याचे खापर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर फोडले आहे. तसेच, या निकालानंतर त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर ; अजित पवारांनी मारला टोला

आशिष शेलार यांनी, ” कुलपती म्हणून मा.राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही..शिक्षण तज्ञांची मते घुडकावली…युजीसीला जुमानले नाही…मंत्री मंडळात चर्चा केली नाही… विद्यार्थ्यांना अखेर पर्यंत वेठीस धरले..अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले…काय साध्य केले?” असा सवाल उपस्थित केला.

महाराष्ट्र सरकारने ‘स्वतःच तोंडावर पडून दाखवले’ ; आशिष शेलरांची जहरी टीका

यासोबतच त्यांनी, ” एका ‘बबड्याच्या’ हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला…त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला…आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण?मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!”अशी बोचरी टीका उल्लेख न करता आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीवर केली आहे.

अंतिम वर्षांच्या परीक्षा होणारच : सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!