🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : गेले ५ महिने कोरोनाने राज्यात कहर माजवला आहे. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मुंबई, पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरात देखील कोरोनाचे रुग्ण वाढीने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात देखील 200 ऑक्सिजन बेडयुक्त जम्बो रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या रुग्णालयाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या लोकार्पणावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याने राज्यभरात या सोहळ्याची चर्चा रंगली आहे. तर, यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकात पाटील हे देखील उपस्थित होते. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघे कार्यक्रमाला येणार म्हणून ब्रेकिंग न्यूज येत होती. त्यांना माहीत नव्हतं, की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येणार आहेत म्हणून. राजकीय भूमिका आणि मतं वेगवेगळी असू शकतात, मात्र निवडणूक झाल्यावर सगळं विसरुन जावं” असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.
महाराष्ट्र सरकारने ‘स्वतःच तोंडावर पडून दाखवले’ ; आशिष शेलरांची जहरी टीका
दरम्यान, “गेल्या रविवारपासून हा तिसरा कार्यक्रम आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वतः खर्च करुन हे रुग्णालय उभं केलं आहे, त्याचं अभिनंदन. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या उपचारासाठी अडचण नको म्हणून हे रुग्णालय आहे. उद्या कुठल्याही नागरिकाला बेड उपलब्ध नाही, असं होता कामा नये, त्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे” असं अजित पवार म्हणाले. तर, महाराष्ट्रात रोज 14 ते 15 हजार रुग्ण आढळत आहेत. पिंपरी चिंचवडचा रिकव्हरी रेट 85 टक्के आहे. यासाठी महापालिका आणि शासनाचे आभार” एवढंच बोलून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण संपवले.
अंतिम वर्षांच्या परीक्षा होणारच : सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल
पिंपरी- चिंचवड शहरात काल (दि.२७ ऑगस्ट) रोजी नव्याने १ हजार १०५ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ७४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील एकूण रुग्ण संख्या ४५ हजार ५१० इतकी झाली आहे.
‘मी नेमका काय गुन्हा केला कि माझी बदली करण्यात आली?’ : तुकाराम मुंढे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

