🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात माशाची चौथी नवीन प्रजाती शोधून काढली आहे. अंबोली घाटातील हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणारा माश्याची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधलीय. या माश्याची ही 20 वी प्रजाती आहे. आणि तेजस ठाकरे यांनी शोधलेली चौथी प्रजाती आहे.
तेजस यांच्या या कामगिरीचे चांगलेच कौतुक होत आहे.भाजपनेते आम.आशिष शेलार यांनी देखील तेजस यांचे कौतुक केले आहे. सामना या वृत्तपत्रातील बातमी शेअर करत ट्विटरवरुन शेलार यांनी तेजस ठाकरेंचं कौतुक केलं आहे. शेलार म्हणाले, “जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी ‘हिरण्यकेशी’ प्रजाती शोधली, त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे असून हे महान कार्य आहे.”
जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले..त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी "हिरण्यकेशी"प्रजाती शोधली. त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! ग्रेट! https://t.co/CJu281Enwl
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 17, 2020
वाइल्ड लाइफ हा तेजस यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून त्यांनी जंगलात अभ्यास करताना खेकड्यांच्या आणि पालीच्या अनेक प्रजाती शोधून काढल्या आहेत. एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबीयांचे नाव दिले आहे. गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडिटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या खेकड्यांच्या प्रजातींची नावे आहेत.या आधी त्यांनी सह्याद्रीच्याच पर्वत रांगात पालींच्या दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
- सिंचन घोटाळा प्रकरण : ईडीने कोकणातील सिंचन प्रकल्पांची माहिती मागवली
- महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांना आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- ‘लोकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करावा’
- ‘मराठा समाज बांधवांचा गेल्या 40 वर्षांचा लढा सार्थकी लागेल,न्यायदेवता न्याय करेल हीच आशा’
- सीना नदीच्या पात्रात विजेचा मनोरा कोसळला; महावितरणची १० उपकेंद्रे अंधारात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
