Share

विधानपरिषद निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी आशिष शेलार विदर्भ दौऱ्यावर

Published On: 

🕒 1 min read

नागपूर:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ पाहायला मिळाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही काँग्रेस उमेदवार विजयी ठरलाय.

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पराभव का झाला? या मागील कारण शोधण्यासाठी भाजप नेते आशिष शेलार कामाला लागले आहेत. शेलार यांना भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आशिष शेलार तीन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. ते काल (26 डिसेंबर) संध्याकाळी नागपुरात दाखल झाले. त्यांनी आज (27 डिसेंबर) सकाळपासून भाजपच्या जवळपास 80 पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नागपूरमधील कामे आटोपल्यानंतर ते उद्या अमरावतीत जाणार आहेत.

दरम्यान, दुसरीकडे या निवडणुकीत पुणे आणि मराठवाड्यातही पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींकडून भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांना पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या पराभवाचे कारण शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात जाऊन चिंतन करण्यास भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!