Share

Shelar vs Pawar | शरद पवारांविरुद्ध आशिष शेलार मैदानात! कोण मारणार बाजी?

Published On: 

मुंबई : भाजपनेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. आशिष शेलार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार गट विरुद्ध आशिष शेलार अशी लढत रंगणार आहे. शरद पवार गटाकडून भारताचे माजी क्रिकेटपटू संदिप पाटील अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २० ऑक्टोबरला MCA ची निवडणूक होणार आहे.

शरद पवार गटाकडून माजी क्रिकेटपटू संदिप पाटील रिंगणात आहेत. त्यामुळे क्रिकेटर विरुद्ध राजकारणी अशी लढत पाहायला मिळणार आहे. एमसीए अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा होता. मात्र मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अर्ज दाखल केल्यामुळे २० ऑक्टोबरला  क्रिकेटर विरुद्ध राजकारणी सामना पाहायला मिळणार आहे.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण-

मुंबई क्रिकेट असोसिएशन ही प्रशासकीय संस्था आहे. एमसीएच्या कार्यक्षेत्रात पश्चिम उपनगरामधील डहाणू, मध्य उपनगरातील बदलापूर आणि खारघर पर्यंत नवी मुंबईचा समावेश आहे. शरद पवार यांनी देखील एमसीएचं अध्यक्षपद भूषवले आहे. दरम्यान आशिष शेलार यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्थापना १९३० मध्ये झाली. मुंबईत झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत विजय डी पाटील यांचा २७  मतांच्या फरकाने पराभव करून शरद पवार यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी फेरनिवड झाली होती. एमसीए अध्यक्षपदासाठी पवार यांनी पाटील यांचा १७२-१४५ असा सरळ लढतीत पराभव केला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!