Share

Ashish Shelar | “राहुल गांधींना झप्पी मारणारे आदित्य ठाकरे गप्प का?”; आशिष शेलारांचा खोचक सवाल

Published On: 

Ashish Shelar |  मुंबई : भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. तुरुंगात असताना भीतीपोटी माफीनाम्यावर स्वाक्षरी करून सावरकरांनी ब्रिटीशांना मदत केली आणि महात्मा गांधी आणि इतर समकालीन भारतीय नेत्यांचा विश्वासघात केला, असा दावा राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी केला. राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरे का गप्प आहेत? असा सवाल भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले, “राहुल गांधी जाणूनबुजून सावरकरांचा अपमान करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान काँग्रेस करत आहे. शिवसेना सत्तेसाठी माती खात असून, केवळ बोटचेपी भूमिका घेत इशारे देण्याचे काम करत आहे.”

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी यांनी मणिशंकर अय्यर यांना जोडे मारले होते. ‘भारत जोडो यात्रेत’ राहुल गांधींना झप्पी मारणारे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) गप्प का? राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध का करत नाही? असा प्रश्न आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरेंना केला आहे.

पुढे ते म्हणाले, “मराठी माणूस, देशभक्त नागरिक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना माफ करणार नाही. तुमचं राजकारण आणि महाविकास आघाडी तुम्हाला लखलाभ राहो. शिवसेनेने महाराष्ट्र धर्म निभावत, निर्णय घ्यावा,” असेही शेलार यांनी म्हटलं. भाजपाचे नेते राहुल गांधींना उघड पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शेलारांनी यावेळी दिलाय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!