Share

नागपूर महानगर पालिकेतील तब्बल २२६ जण कोरोनाबाधित

Published On: 

नागपूर : शहरात सर्वत्र कोविड-१९ चा प्रादुर्भाव पसरत असतानाच नागपूर महानगरपालिकेमध्येही धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. मनपा मुख्यालयासह झोन कार्यालय, विविध विभागातील विविध अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह आतापर्यंत २२६ जण कोरोनाबाधित झाले आहेत. यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

मनपा कार्यालय प्रत्येक कार्यालयीन दिवशी सुरू असल्याने अनेक जण संपर्कात येतात. त्याचाच फटका येथील उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, सहायक आयुक्त अशा वरिष्ठ अधिकार्‍यांसह २२६ जणांना बसला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. मनपामध्ये कोणत्याही महत्त्वाच्या कामाविना येण्याचे टाळावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

कोविडचा सर्वाधिक संसर्ग मनपाच्या शिक्षण विभागात झाला आहे. आतापर्यंत शिक्षण विभागातील ३६ अधिकारी, कर्मचारी पॉझिटिव्ह आले असून, यापैकी ४ जणांना जीव गमवावा लागला आहे. अशीच स्थिती गांधीबाग झोन कार्यालयातील असून, येथील ३४ पॉझिटिव्ह रुग्णांमधून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हनुमाननगर झोनमध्येही २५ कर्मचारी कोरोनाबाधित आहेत तर दोघांचा मृत्यू झाला.

याशिवाय मनपा मुख्यालयातील अग्निशमन विभागातील ३६, धरमपेठ झोन कार्यालयातील २५, सामान्य प्रशासन विभागातील २१, कर व कर आकारणी विभागातील १२, घनकचरा व्यवस्थापन विभागातील ८, आसीनगर झोन कार्यालयातील ७, नगररचना विभागातील ५, कपिलनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५, शेंडेनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ४, हुडकेश्‍वर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील २, क्रीडा व सांस्कृतिक विभागातील २, जाहिरात विभाग, जयताळा माध्यमिक शाळा आणि झोपडपट्टी भाडेपट्टा वाटप विभागातील प्रत्येकी १ जण कोविड पॉझिटिव्ह आहे.

एकमेकांच्या संपर्कात येणे टाळा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि मुख्य म्हणजे विनाकारण फिरणे टाळणे आवश्यक आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, श्‍वास घ्यायला त्रास, जिभेला चव न येणे, वास न येणे अशी लक्षणे आढळल्यास किंवा कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तातडीने आपल्या नजीकच्या मनपा कोविड चाचणी केंद्रात जाऊन चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:-

ऊर्जा मंत्र्यांच्या शहरात वीज केंद्रात गैरव्यवहार, सेनेच्या खासदाराची सीआयडी चौकशीची मागणी

‘त्या’ समाजकंटकांना तातडीने अटक करा, माजी ऊर्जामंत्र्यांचा इशारा कोणाकडे ?

मुंढेंच्या समर्थनार्थ फडकला तिरंगा… एकवटले हजारो नागरिक

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!