🕒 1 min read
नागपूर : जिल्ह्यातील मौदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्थापित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली. या गंभीर आणि संतापजनक प्रकाराबाबत पोलिस स्टेशन मौदा येथे तक्रार केली आहे. हे समाजात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने योग्य ती दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीवजा विनंती भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
याप्रकरणी नागरिकांनी शांतता राखावी, असे नम्र आवाहनही बावनकुळे यांनी केले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न करावे. समाजात भांडणे व्हावीत असेच षडयंत्र हे समाजकंटक रचत असतात, आपण त्यांना बळी पडू नये.
पोलिसांनी या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींना तातडीने अटक करावी, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या या कठीण काळात प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, प्रत्येकाने अंतर पाळावे आणि शासनाच्यानियमांचे यथायोग्य पालन करावे असे आवाहन देखील नागरिकांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!
मुंढेंच्या समर्थनार्थ फडकला तिरंगा… एकवटले हजारो नागरिक
मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते- राधाकृष्ण विखे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
