🕒 1 min read
नागपूर : तुकाराम मुंढेंची बदली रद्द झाल्याचे काळताच नागपूरकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रत्येकाला मुंढे नागपुरातच राहणार असे वाटायला लागले. अनेकांनी तर मुंढे नागपुरात जिल्हाधिकारी म्हणून येत असल्याच्या अफवेला देखील खतपाणी घातले कारण रवींद्र ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र मुंढेंच्या बदलीचा शासकीय आदेश रद्द झालेला नसून त्यांचे केवळ पोस्टिंग रद्द झाले असल्याचे नागपूरकरांना कळाले आणि आनंदावर विरजण पडले.
आज भल्यासकाळी तपस्या या शासकीय निवासस्थानाबाहेर मुंढेंच्या समर्थनात नागरिकांनी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे नागपूर शहराला वाचवा असे फलक देखील अनेकांच्या हाती बघायला मिळाले. काहींनी वंदे मातरम तर काहींनी भारत माता की जयचे नारे लगावले. विशेष म्हणजे शहरात कोरोनाचे प्रमाण झपाट्याने पसरते आहे. मुंढे स्वतः शासनाच्या नियमनाचे पालन करा, असे देखील सांगत आहेत तरीही नागरिकांची ही गर्दी बघायला मिळाली यात सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
तुकाराम मुंढेंना आता बदली होणे काही नवीन नाही तसेच त्यांच्या समर्थनात होणारे धरणे आंदोलन देखील नवे राहिलेले नाही. मुंढेंच्या धडाकेबाज वृत्तीचे लोक चाहते होतात हे सत्यच आहे. मुंढेंच्या बदलीमुळे लोक पेटून उठतात आणि कोरोनाच्या जीवघेण्या संकटातही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास धजावत नाहीत हेच आज नागपूरकरांनी दाखवून दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!
मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते- राधाकृष्ण विखे
काँग्रेसच्या इशाऱ्यावरून कंगनावर कारवाई: प्रज्ञासिंह ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
