🕒 1 min read
Arvind Sawant | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
“नपुंसक पद्धतीने राज्य चालवलं जातयं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद म्हणण्याचा हक्क भाजपाने कायमचा गमावला आहे. इतकं नपुंसकत्व ते सतत सिद्ध करत आहेत. दिल्लीचेही तख्त सोडाच, दिल्ली पुढेही गुडघे टेकतो महाराष्ट्र माझा अशी यांची अवस्था आहे,” अशी घणाघाती टीका अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी राज्य सरकारवर केली आहे.
पुढे ते म्हणाले, “लोकशाहीच्या मूळावर घाव घालण्याचं काम भाजपा करत आहे. त्यांना कर्नाटक सरकारचा पाठिंबा आहे. मुख्यमंत्री बोम्मई जेव्हा स्वत: असं बोलतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यामुळे तिथल्या अशा दिवाळखोर लोकांना अधिकच स्फुर्ती मिळते. कारण, सरकारचा आणि त्यांच्या गृहखात्याचा त्यांना प्रचंड पाठिंबा असतो, म्हणून हे एवढं धाडस करतात. त्यात त्यांनी हेदेखील पाहीलं की इकडे सगळे बोटचेपे बसलेले आहेत. या मिंध्यामुळे सध्या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणखी सत्यानाश होतोय.”
दरम्यान, शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलेलं आहे. यावर “आम्ही बेळगावचा दौरा रद्द केलेला नाही, तर तो केवळ पुढे ढकलला आहे. लवकरच आम्ही बेळगावला जाऊ. याबाबत मा. चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत चर्चा करून दौरा निश्चित करू, असे स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलंय.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “महाविकास आघाडी समविचारी पक्षांना सोबत घेण्यास तयार”, अजित पवार स्पष्ट बोलले
- Akshay Kumar | अक्षय कुमार आगामी चित्रपटातून देणार लैंगिक शिक्षणाने धडे
- Shambhuraj Desai | “वास्तविक आम्हाला कर्नाटकला जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, मात्र…” ; शंभूराज देसाई यांचे स्पष्टीकरण
- Raj Thackeray | “बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचे हे पदरही उलगडायला हवेत”; महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचं अभिवादन
- Health Care | दिवसभर कोमट पाणी पिल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
