पुणे- कोरोना काळात टाळेबंदी करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.दिवसेंदिवस देशात इंधनाचे दर वाढत असूनसततच्या दरवाढीमुळे पेट्रोल शंभरीकडे वेगाने जात आहे. सत्तेत येण्यापूर्वी भाजप याच मुद्द्यावरून कॉंग्रेसवर जोरदार टीका करत होता मात्र आता सत्तेत आल्यानंतर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
इंधन आणि गॅसचे दर वाढवून मोदी सरकार सर्वसामान्यांची लूट करीत असून उद्योगपती मित्रांचा खरच फायदा करत असल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य असल्याचं आता अधोरेखित होऊ लागले आहे.गेल्या वर्षाअखेरीस दरांत काहीशी घट झाली होती. मात्र जानेवारीपासून भडका वाढतच आहेत.
या महिन्याच्या सुरवातीपासून वाढत्या किंमत लक्षात घेता फेब्रुवारीअखेर पेट्रोल १०० रुपये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिसेंबरनंतर इंधनाचे दर कमी होतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला होता. तसेच वाहन चालकांना या दरांमुळे बसणारी छळ पाहता राज्य किंवा केंद्र सरकार कर कमी करतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्याच्या उलटे होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी तेल उत्पादक देशांनी कृत्रिम स्वरुपात किंमती वाढवल्यामुळे इंधनवाढ होत असल्याचे म्हटले आहे.दरम्यान,पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 2 प्रकारचे कर देखील जोडले जातात. केंद्र सरकारची उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारांचं व्हॅट. व्हॅट म्हणजेच मूल्यवर्धित कर दर जो प्रत्येक राज्यात वेगळा असतो. हे सर्व जोडल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत तीनपट महाग होते त्यामुळे या करांच्या जोखडातून काही काळ इंधनाला मुक्त केले तर काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान,एकीकडे देशात पेट्रोलने सर्वाधिक दराची पातळी गाठलेली असताना आसाममध्ये मात्र ते 5 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. भाजपशासित आसाममध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाच रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. याशिवाय तेथील दारूवरील कर 25 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंडला पराभूत करणाऱ्या टीम इंडियाच्या शिलेदारांनी नावावर केले हे विक्रम
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- ये नया हिंदुस्तान है…जाणून घ्या LAC वरुन चीनने अचानक माघार का घेतली?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- उद्धव ठाकरे हे संवेदनशील नेते; राज्यात कायद्याचचं राज्य आहे – संजय राऊत


