Share

बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर धनगरांसाठी आर्टी ची मागणी मान्य होईल ?

Published On: 

पुणे : राज्यात धनगर समाजाची देखील आरक्षणाची मागणी मागील काही वर्षांपासून होतेय. महाराष्ट्रातील भटके विमुक्त हे केंद्रात ओबीसी प्रवर्गात गणले जातात. मात्र धनगरांचा समावेश राज्यात एसटी अर्थात अनुसुचित जमातीत करण्यात यावा अशी धनगर समाजाची आग्रही मागणी आहे. आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल मात्र त्याआधी बार्टी व सारथीच्या धर्तीवर धनगर समाजासाठी अहिल्यादेवी होळकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात आर्टीची स्थापना करावी अशी मागणी विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यात सध्या मागासवर्गीय विद्यार्थी व तरूणांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात बार्टी कार्यरत आहे. बार्टीला भरभक्कम निधीदेखील उपलब्ध करून देण्यात येतो. त्याद्वारे मागासवर्गिय समाजासाठी शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन क्षेत्राशी संबंधित विविध योजना राबविण्यात येतात. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना भरघोस मदत दिली जाते. मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागल्यानंतर फडणवीस सरकारने मराठा कुणबी समाजासाठी राजर्षी शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टीट्यूट अर्थात सारथी संस्थेची स्थापना केली. बार्टी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविते तशाच योजना या सारथीतर्फे मराठा व कुणबी समाजासाठी राबविल्या जात आहेत. फडणविस सरकारने त्यांच्या कार्यकालाच्या शेवटी ओबीसींसाठी महाज्योती संस्थेच्या स्थापनेची घोषणादेखील केली होती.

आरक्षणाची लढाई ही दीर्घपल्ल्याची आहे हे लक्षात आल्याने आता आर्टीच्या स्थापनेची मागणी पडळकरांनी केली आहे. धनगर व भटक्या विमुक्त समाजासाठी मात्र अशी संस्था नाही. या समाजातील विद्यार्थी तरूणांना उच्चशिक्षण व प्रशिक्षणासाठी संस्थात्मक मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. एकूण धनगर व भटक्या विमुक्तांसाठी अशी संस्था उभी राहिल्यास त्याचा फायदा व्हीजे एनटी, एनटी बी, एनटी सी आणि एनटी डी प्रवर्गाता येणाऱ्या सर्व जाती पोट जातींना मिळेल त्यामुळे आगामी काळात ही मागणी जोर पकडण्याची शक्यता आहे. तसेच सध्या भाजपमध्ये असलेल्या गोपीचंद पडळकरांनी ही मागणी लावून धरत महाआघाडीसमोर मोठे आव्हान उभे करण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. मुख्य प्रवाहापासून लांब राहिलेल्या या धनगर व भटक्या विमुक्त समुदायाची स्वतंत्र संस्कृती व ओळख तसेच रूढी व परंपरांचे संशोधन अशा सर्व उपक्रमांना चालना मिळण्याचा कयास आहे.

राज्यात सध्या भटके विमुक्त आणि धनगर समाजासाठी वसंतराव नाईक महामंडळ अस्तित्वात आहे. मात्र या महामंडळाकडे निधीची कमतरता आहे. शिवाय त्याच्या योजना या विद्यार्थी व तरूणांच्या बदललेल्या शैक्षणिक अपेक्षांची पूर्तता करत नाही हा मुख्य नाराजीचा सूर आहे. या महामंडळामार्फत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या या अत्यल्प आहेत. आर्टी संस्थेच्या स्थापनेसाठी पडळकर यांनी धनगर समाजाला संघटित केल्यास महाआघाडी सरकारला या मागणीकडे दुर्लक्ष करणे अवघड होईल हे मात्र नक्की!

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!