Share

मोठी बातमी : विराट कोहलीला अटक करा, मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल

Published On: 

हैद्राबाद : ‘ऑनलाइन जुगारा’ला प्रोत्साहन दिल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत विराटला अटक करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.

कोहली व्यतिरिक्त अभिनेत्री तमन्ना भाटियावरही असाच आरोप लावण्यात आला असून तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेन्नईच्या एका वकिलाने मद्रास न्यायालयात ऑनलाइन जुगार खेळण्यावर बंदी घालण्याच्या निर्देशासाठी याचिका दाखल केली होती. ”ऑनलाइन जुगार कंपन्या तरुणांना ब्रेन वॉश करण्यासाठी विराट आणि तमन्नासारख्या नावाजलेल्या व्यक्तींचा उपयोग करत आहेत. त्यामुळे या दोघांनाही अटक करण्यात यावी”, असे या याचिकेत म्हटले गेले आहे.

‘अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देऊ शकणारी प्रतीपालकत्व योजना क्रांतिकारी ठरणार’

ऑनलाइन जुगारासाठी घेतलेले पैसे परत न मिळाल्यामुळे जीव गमावलेल्या युवकाचा संदर्भही या याचिकेत देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजकाल ऑनलाइन सामने खेळले जात असून अनेक क्रिकेटपटूंकडून त्यांची जाहिरात केली जाते. विराटही ऑनलाइन गेमला प्रोत्साहन देतो. यंदाच्या आयपीएलची घोषणा झाल्यामुळे विराटही अन्य भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणेच लीगची तयारी करत आहे. या लीगचा पहिला सामना युएईमध्ये 19 सप्टेंबरला खेळला जाणार आहे.

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती घराघरात आणि मनामनात साजरी करा’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!