Share

कोरोना गेल्यानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी परीक्षेची व्यवस्था: उदय सामंत

Published On: 

कोल्हापुर: गेल्या ३ महिन्यांहून अधिक काळ कोरोना संसर्गाचा कहर सुरु असून राज्यासह देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शैक्षणिक क्षेत्रासह सर्व क्षेत्रांची घडी विस्कटली आहे. तर या कोरोनाच्या संकटात अंतिम वर्षाच्या परिक्षेवरून मात्र राज्यात चांगलंच राजकारण तापलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालक देखील भविष्याबाबत चिंतेत आहेत. युजीसीने व राज्य सरकारने एकत्रित भूमिका घेऊन सांमजस्याने हा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.

आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ दौऱ्यावर होते. त्यांनी, ‘कोरोनाच्या संकटामध्ये परीक्षा घेणं शक्य नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारला परीक्षा घ्यायच्या नाहीत, हा समज चुकीचा आहे. अचानक कोरोनाचं संकट दूर होणार आहे का? युजीसीने सगळ्या विद्यापीठांचा आढावा घ्यावा. रेड झोनमधील विद्यार्थी येऊन परीक्षा कशी देऊ शकतात, ते युजीसीने सांगावे,’ अशी भूमिका स्पष्ट केली.

…तर राज्यातील जवळपास १३०० डॉक्टर करणार आंदोलन

तर, कोरोना गेल्यानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी आम्ही परीक्षेची व्यवस्था केली आहे. राज्यातल्या सगळ्या कुलगुरूंशी चर्चा करुन सरकारने निर्णय घेतला आहे. तसेच प्रश्नपत्रिका तयार करणं, उत्तरपत्रिका तपासणं हे काम काय रोबोट करु शकणार नाहीत. त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेणं शक्य नाही, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिल्याचे झी २४ तासच्या बातमीतून कळत आहे.

दरम्यान, आज त्यांनी शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी शैक्षणिक उपक्रमांसंदर्भात बैठक घेतली. तसेच ह्यावर्षी पासून सीमाभागात शैक्षणिक उपक्रम सुरु करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी ट्विटरवरून सांगितले.

BCCI जनरल मॅनेजर साबा करीम यांचा राजीनामा; आता नवीन उमेदवार शोधणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!