मुंबई: गेल्या ३ महिन्यांहून अधिक काळ कोरोना रोगाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला असून देशात एकूण १० लाखांहून अधिक तर राज्यात ३ लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत. या भयानक रोगाचा पराभव करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांपासून ते सर्व कर्मचारी वर्गाला कोविड योद्धा असा आदर देखील दिला गेला. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळेच राज्यातील जवळपास १३०० डॉक्टरांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, १८ वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांचा समावेश आहे. मागील ५ वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयात काम करून देखील अद्याप नोकरीत कायम न केल्यामुळे या डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच त्यांना मार्च महिन्याचा पगार देखील ५० टक्केच देण्यात आला आहे. एकीकडे केरळातून दीड ते दोन लाख रुपये पगार देऊन डॉक्टरांना आणण्यात येतं आणि इथे काम करणाऱ्यांना ना पगार व्यवस्थित देण्यात येतो ना त्यांना नोकरीत कायम करण्यात येतं. त्यामुळे संपूर्ण आयुष्य अधांतरी चाललं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल, राम मंदिराच्या भूमीपूजनावरून पवारांचा टोला
याबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन मूलकुटकर म्हणाले की, आम्ही आमच्या सहाय्यक प्राध्यापकांच्या मागणीबाबत वैद्यकीय राज्यमंत्री अमित देशमुख, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन आमच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. परंतू अद्याप आमची मागणी मान्य झालेली नाही. सध्या कोरोनाची भयावह परिस्थिती आहे तरीदेखील डॉक्टर एकही सुट्टी न घेता कामावर येतं आहेत. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि मागण्या मान्य कराव्यात, असे एबीपी माझाशी बोलताना त्यांनी सांगितलं.
शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता अडकला कोरोनाच्या विळख्यात,कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांच्याही चिंतेत वाढ
तर, राज्यभरात १८ सरकारी वैद्यकीय महाविद्यालये असून यामध्ये ३१२४ पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. परंतु सध्या मात्र केवळ १८४० पदे भरण्यात आली आहेत. अजूनही जवळपास १३०० पदे भरणे बाकी आहेत. त्यातच कोरोना महामारीमुळे या डॉक्टरांवर सद्या कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे एकीकडे कामाचा प्रचंड ताण, तर पगार वेळेत नाहीत. तर दुसरीकडे विशेष म्हणजे अजूनही कंत्राटी पदावर असल्यामुळे कोणत्याही क्षणी नोकरी जाण्याची भीती अशा समस्यांना या डॉक्टरांना सामोरे जावे लागत आहे.
हॅशटॅग आणि जाहिरातींवर खर्च केलेला पैसा दिल्लीसाठी खर्च केला असता तर… गंभीरचा केजरीवालांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

