मुंबई : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान(Aryan Khan), अरबाज मर्चंट (Arbaz Marchant), मुनमुन धमेचा आणि इतर काही आरोपींना क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Drugs case) अटक झाली होती. अटींनुसार दर शुक्रवारी त्यांना एनसीबी कार्यालयात हजर रहावे लागणार आहे. अरबाज आज वडिलांसोबत एनसीबी कार्यालयात हजर झाला होता. दरम्यान, त्याचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
दरम्यान अरबाज एनसीबी कार्यालया बाहेर येताच फोटोग्राफर पोज देण्यास सांगतात. त्यावेळी त्याचे वडील अस्लम मर्चंट तेथे उपस्थित असतात. ते अरबाजला फोटोसाठी पोज देण्यास सांगतात. हे सर्व पाहून अरबाज वडिलांवर संतापतो आणि कपाळाला हात मारत ‘Stop it Dad’ असे रागात म्हणतो. त्यानंतर तो रागात जाऊन गाडीत बसतो. अरबाज आणि त्याच्या वडिलांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
https://www.instagram.com/reel/CWu_AOrIVG4/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, २९ ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन मंजूर केला होता. हायकोर्टाने आपल्या आदेशाचा मुख्य भाग उपलब्ध करून दिला ज्यामध्ये आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. आज शुक्रवार असल्यामुळे अरबाज मर्चंट हा वडीलांसोबत एनसीबी कार्यालयात हजर होता. तसे दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल, असे या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. जामीन आदेशानुसार, त्यांना त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागला आहे. मात्र या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या रॅलीला परवानगी; एमआयएमला का नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे- खा. जलील
- ‘केंद्र सरकार संविधान बदलू पाहतंय, भाजपला कडाडून विरोध करा’
- औरंगाबादेत जिन्सी प्रकरण रंगले; आजी-माजी प्रशासकांचा पलटवार!
- ‘या’ ठिकाणी आहे ‘देवमाणूस’ मधील डॉ.अजित कुमारचा पुतळा; पाहून बसेल धक्का
- औरंगाबादेत एसटी संपकरी ठाम; रुजु होण्यासाठी महामंडळाकडून ‘अल्टिमेटम’!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

