Share

मी आयपीएलवर सट्टा लावला, अरबाज खानची धक्कादायक कबुली

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याची कबुली बॉलीवूड अभिनेता अरबाज खान यानं दिली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अरबाज खानची चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान आयरपीएल सामन्यांवर बेटिंग केल्याची कबुली अरबाजनं दिली. याशिवाय 5 वर्षांपासून बुकी सोनू जालानच्या संपर्कात असल्याची माहितीदेखील त्यानं पोलिसांना दिली आहे.

दोन दिवसापूर्वीच ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कुप्रसिद्ध सट्टेबाज सोनू जालानला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून अरबाज खानचे नाव समोर आले. सोनू जालान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माणूस असल्याचे म्हटले जाते. सट्टेबाजीमध्ये अरबाजला २.८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे टाइम्स नाऊने म्हटले आहे. अरबाज सोनू जालानला ३ कोटी रुपये देणे होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. पैसे दिले नाहीस तर नाव उघड करण्याची धमकी सोनूने अरबाजला दिली होती असे टाइम्स नाऊने आपल्या वृत्तात म्हटले आहे. १५ मे रोजी डोंबिवलीतून सट्टेबाजी रॅकेट चालवणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान , बुकी सोनू जालानकडे बॉलिवूडचा मोठा निर्माता पराग सांघवीही सट्टा लावायचा, अशी खळबळजनक माहिती अरबाझ खानच्या चौकशीतून समोर आली आहे. पराग सांघवीनी निर्मिती केलेले नुकतेच 2 मोठे चित्रपट रिलीज झाले. लवकरच सांघवीलाही ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधी पथक चौकशीला बोलावणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!