Share

Aravind Sawant | अरविंद सावंतांचा शिंदे गटावर निशाणा; म्हणाले, “चाळीस आमदारांना गाडण्यासाठी…”

Published On: 

Aravind Sawant | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. एकीकडे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा कलगीतुरा रंगलेला आहे तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, आनंदाचा शिधा आणि अन्य विषयांवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीपूर्वी खासदार अरविंद सावंत (Aravind Sawant) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

४० आमदारांना गाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोक वाट पाहत आहे. निवडणूक लागली की लोक त्यांना घरी बसवतील, असं म्हणत अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला फैलावर घेतलं आहे. माहिती अधिकाराअंतर्गत ‘वेदान्त फॉक्सकॉन’ प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातच राज्याबाहेर गेल्याच समोर आलं आहे. यावर  अरविंद सावंत (Aravind Sawant) यांनी भाष्य केलंय.

सावंत म्हणाले, “संतोष गावडे नावाच्या मुलाने ३१ ऑक्टोंबरला पत्र लिहलं आणि तेव्हाच त्याला उत्तरही आलं. एमआयडीसीकडे उत्तर तयार होतच, फक्त कोणाच्या तरी पत्राची वाट पाहत होते,” असा चिमटा सावंत यांनी काढलाय.

“प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात गेला असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी बैठका का घेतल्या. याप्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी सरकारची चिरफाड केली आहे. तसेच, समोरासमोर येऊन चर्चा करा, असं आव्हानही आदित्य ठाकरेंनी दिलं आहे,” असंही अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!